Sponsored
Sponsored
Free Edition
Verified Content
Vasunaka (वासूनाका)
Overview
Vasunaka (1965), rocked the boat on account of its alleged obscenity. In a series of stories Padhye narrates, through the gang member Pokya, the exploits of a sex-crazed gang of youths who frequent "Vasunaka" to harass women. These were only symptoms of sexual repression, but they pointed to a much deeper social malaise. Pokya also gives us portraits of characters from the greater community of Valpakhadi in Bombay that sustains this gang. In the story Samna Padhye observes the limits of his character-narrator, and yet reveals a portrait of society that's not intended by him.
वासूनाका
- दुर्गा भागवत
वासूनाका हा श्री. भाऊ पाध्ये यांच्या नऊ गोष्टींचा संग्रह आहे. मुंबईच्या कुठल्याही नाक्यावरच्या बकालपणाचा अतितीव्र उपहासाबरोबरच लेखकाला सहसा दुर्लभ असलेल्या निर्मम करुणेपोटी उद्भवलेल्या कथा वाचताना अंगावर शहारे येतात. या जगात जन्मतात, वाढतात, प्रजनन करतात आणि नंतर मृत्यूमुळे घाणीच्या प्रवाहातून कुठेतरी अज्ञातात फेकले जातात, अशा क्षीण व क्रूर, पाशवी वासनेने हतबल व हतबुद्ध झालेल्या जिवांच्या या कथा आहेत. मोठमोठ्या शहरात अनेक मोठमोठ्या सुंदर गोष्टी जन्म घेतात; पण तिथेच ठायी ठायी अशी डबकी असतात की त्यांची नैतिक दुर्गंधी समग्र नागर जीवनाला सदैव व्यापून टाकते. आतून लागलेली ही क्षुद्र जीवजंतूंची कीड कधीही कशानेही मारत नाही. इथे अब्रू फिरली तर लक्तरातच फिरते. मवालीगिरीच्या बरबटात ती अखंड वेडेचार करीत भटकत असते. वासनांच्या विचकट बुजबुजाटातून आपली सुटका होणार नाही हे तिला माहीत असते; आणि देव, धर्म, संस्कृती यांनी तर कायमची आपणाकडे पाठ फिरवलीच आहे. पंसाध्ये गृहस्थीपणाचे कामसुखही आपल्याला वंचित झालेले आहे. हे त्या अब्रूला कळते. ती आक्रंदते, सूडाने पेटते, फणकारते, फुत्कारते, पण हार होवो की जित अखेर ती अगतिक होऊन पडते; आपण मरणार नाही या जाणीवेच्या पोटी उद्भवलेली ती भयाण अगतिकता असते. आणि मग अनिर्बंध स्त्री-पुरुषसंबंधांभोवती वेडा पिंगा घालण्यापलिकडे तिला काही करण्यासारखे उरत नाही.
वास्तविक पहाता या कथांत एकच मूळ कल्पना आहे. ती म्हणजे पोरवयातच बिघडलेल्या माणसांच्या अतृप्त लैंगिक वासनेची. पोरसवदेपणाचा सारा निरागसपणा कधीच नाहीसा झालेला असतो. पण पिसाटपणे कशामागे तरी आसुसून लागण्याचा भाबडेपणा यातल्या प्रत्येक पात्रात आहे. वासनेच्या भुकेचे बळी आहेत सारे. वखवखलेले, मत्सरी . मूर्ख असले तरी त्यांना बरेवाईटातला फरक कळतो. लैंगिक वासना उत्तान असल्या तरी त्यांना अस्सल कमअस्सल बरोबर समजते. तसे पाहिले तर आपापल्यापरीने प्रत्येकच पात्र धूर्तपणे वागू पहाते. सदैव दुस-यावर मात करण्यास धडपडते, पण त्यांच्या कुणाच्याही धडपडीला काही यश येत नाही. जिथे यश येते तिथेच उदंड वैताग माजतो. वासना व वैताग यांची सांगड आडदांड, व्यसनी, बेशिस्त, बेजबाबदार पुरुषांच्या पात्रात तर बेमालूम पडली आहे. हे सारे पुरुष उंडगे म्हणजेच मनाचे दुबळे आहेत, आणि वरकड उद्दामपणा आणि दुस-याच्या अब्रुनुकसानीचे सवंग शस्त्र परजून आत्मसंरक्षण करण्याखेरीज त्यांना गत्यंतरच नसते. अर्थात ही दोन्ही हत्यारे वापरण्यास टोळीचे जीवन हवेच. पण ही टोळी धाडसी दरवडेखोरांची संघटित उद्दिष्ट असलेली टोळी नव्हे, तर नुसते टोळके आहे. हे लोक चोरबीर नाहीत, राजकीय आकांक्षा असलेले गल्लोगल्लीतले गुंड नाहीत; ते दारुडे, व्यसनी व बीभत्स चलनी भाषा बोलणारे आहेत. टिर्रेबाजी हेच त्यांचे लोकांना जरब बसवण्याचे तंत्र आहे. आणि जमावाने केलेली टिर्रेबाजी भीरू लोकांच्या बाबतीत किती घातक होते याचे चित्रण या कथांत केलेले आहे. अशा कुठलीही आंकाक्षा नसलेल्या पोकळ माणसांची पोकळ घमेंड फक्त चरबट, गोब-या, राठ भाषेत व्यतीत होते. आणि तेच हे बरळ भाषेचे स्वरूप पोकळ व्यक्त्तित्वातून एकत्र होऊन सामाजिक ठाण मांडून बसते. ते ठाण म्हणजेच हा वासूनाका. ते सामाजिक एकत्रीकरण म्हणजेच हे अत्यंत शिथिलतेवर, पण सदाच टोळक्याच्या स्वरूपात आढळणारे, पोक्याच्या शत्रू-मित्र मंडळ. या टोळक्यात आज शत्रू तो उद्या मित्र व आजचा मित्र तो उद्याचा शत्रू होतो. आणि नवल हे की, या मर्यादाही फार पुसट असतात. फिरून रागलोभ एकत्र होऊन या व्यक्ती टोळक्याच्या परिघातच अखंड वावरतात.
या कथांचा परीघ वासूनाक्याचा. म्हणजे हमरस्त्यावरील अड्ड्याचा, म्हणजेच पुरुषपात्रांच्या निरर्गल संचाराचा. हा संचार शारीरिक तर आहेच, पण मानसिकदेखील आहे. नव्हे, अधिक मानसिकच आहे. वासनांच्या डोंबात, शरीर दृष्ट्या मामू, पोक्या, चम्या, टण्या केव्हाच जळून खाक झालेले आहेत. पण मनाची धुगधुगी मात्र त्यांच्यात आहे. आणि हीच धुगधुगी लेखकाने या पात्रांच्या जिवंतकळेच्या चित्रणासाठी वापरलेली आहे. धुगधुगी म्हटली की कुठेतरी आशेचा ताणतणाव आलाच. वासनाच मुळी आशारूप आहे. पण त्या वाह्यातांची आशा, त्यांच्या माणुसकीची जिवंत खूण कशात आहे? द्रव्यात नाही, भोगात नाही. भोग फक्त त्यांचे शरीर भोगते आहे आणि रोज अनावर चिडीने आदल्या दिवशीच्या भोगांचा सूड दुस-या दिवशी दुप्पट होऊन मिळवण्याचा आटापिटा करते आहे. भोग ही ह्यांची गर्ता आहे. तिथे आनंद नाही, प्रेम नाही, शांती नाही. पण ह्या टग्यांच्या रितेपणात जो हिरवा तळ आहे, त्याच्यातून त्यांनी एक गंधर्वसृष्टी निर्माण केलेली आहे. या गंधर्वसृष्टीत फक्त एकच गोष्ट आहे : स्त्री. तरुण अप्सरेसमान स्त्री, पतिव्रता स्त्री. यांच्यासारख्या बाहेरख्याली माणसाशी ती कुठलाच संबंध ठेवीत नाही. ती स्वच्छ असते. अंतरबाह्य स्वच्छ. बोलते गोड. यांच्याशीही. रहाते छानशा बाहुलीच्या घरात. रमते फक्त पतीत. अशीही चिरतरुण गृहिणी-मोहिनी त्या टोळक्याच्या सामुदायिक मनात स्वप्नाप्रमाणे वागत असते. पुराणातल्या कथेप्रमाणे या कथेला हे सारे गणंग अगदी हिरकणीप्रमाणे जपतात. ते एक त्यांचे पार्थिव पूजास्थान असते. सामाजिक नीतीच्या मूल्याचे प्रतीक म्हणजे पतिव्रता बायको. ती आपली नव्हे तर दुस-या कोणाची तरी, असा तिरपागडा नीतीचा पवित...

36,114 currently reading
152,889 want to read
Sponsored
Sponsored
Book details & editions
| ISBN | 9382364153 |
| Publisher | Shabd Publication |
| Publication date | November 2026 |
| Language | MAR |
| Pages | 140 pages |
Sponsored
Sponsored
Ratings & Reviews
5 ★
42%
4 ★
34%
3 ★
16%
2 ★
5%
1 ★
3%
3.71
BlueReads Choice
Sponsored
Write a Review
Community Reviews
Sort by: